बारामती : लोकसभा निवडणुकीमध्ये Lok Sabha Elections 2024 बारामतीतील Baramati हाय व्होल्टेज लढतीचा निकाल हाती आला आहे. अजित पवार Ajit Pawar यांना आपल्या पत्नीचा पराभव स्वीकारावा लागला आहे. हा पराभव जरी त्यांनी स्वीकारला असला तरी आता ते पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. आणि पहिली तोफ त्यांनी आता युगेंद्र पवारांवर Yugendra Pawar डागली आहे.
बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या बारामती तालुका कुस्तीगीर परिषद सदस्यांची नुकतीच बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये युगेंद्र पवार Yugendra Pawar हे अनुपस्थित होते. त्यामुळे बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून त्यांना हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
याबाबत माध्यम प्रतिनिधींनी युगेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधला असता युगेंद्र पवार म्हणाले की, आपल्याला या निर्णयाबाबत कोणतीही माहिती नाही. अध्यक्षपदावरून हटविण्याच्या बाबतीत मला अधिकृत अद्याप कळविण्यात आले नाही. किंवा मला तसे काही पत्र प्राप्त झालेले नाही. मात्र कुस्तीगीर परिषदेच्या सदस्यांची बैठक बोलवण्यात आली होती. त्यामध्ये काहीतरी निर्णय झाल्याची माहिती आहे. असं युगेंद्र पवार म्हणाले आहेत.
बारामती लोकसभा निवडणूक ही जेवढी राजकीय होती त्याहीपेक्षा जास्त ती कौटुंबिक लढाई बनली होती. ज्या दिवशी काका शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांनी महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी कुटुंबातील कटुता वाढत गेली. ज्या दिवशी मतदान होणार होते त्या दिवशी सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी अजित पवार घरी नव्हते. पण इतर सर्व कुटुंबीयांना त्या भेटल्या परंतु या राजकीय लढाईने कुटुंबामध्ये मोठी दरी निर्माण केली आहे. आणि आता या निकालाने देखील या दरीतील अंतर वाढतानाच दिसते आहे.