WhatsApp New Features : WhatsApp आणि Meta AI सध्या युजर्ससाठी एका नव्या फीचरवर Features काम करत आहेत. WhatsApp आणि मेटा एआयच्या एकत्रीकरणामुळे वापरकर्त्यांना मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर एआय जनरेटेड इमेज तयार करता येणार आहे. WhatsApp चे हे एआय फीचर येत्या काही दिवसांत युजर्ससाठी उपलब्ध केले जाऊ शकते.
WABITINFO डब्ल्यूएबीटाइन्फोने दिलेल्या माहिती नुसार, सध्या अँड्रॉइड युजर्ससाठी Android users बीटा व्हर्जनवर या फीचरची टेस्टिंग सुरू आहे. चला जाणून घेऊया या फीचर विषयी सविस्तर माहिती
WhatsApp वर युजर्संना एआय इनेबल्ड फीचर मिळणार आहे. जे बीटा व्हर्जनमध्ये स्पॉट करण्यात आले आहे. हे फीचर रोलआऊट झाल्यानंतर युजर्स WhatsApp वर AI यच्या माध्यमातून प्रोफाईल पिक्चर तयार करू शकणार आहेत. फोटो जनरेट करण्यासाठी युजर्सला डिस्क्रिप्शन द्यावं लागेल, त्या आधारे हे फीचर पिक्चर तयार करेल.
टिप्सटरने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एआय-संचालित प्रोफाइल फोटोसह, वापरकर्ते पूर्णपणे वैयक्तिक प्रतिमा तयार करण्यास सक्षम असतील. वापरकर्ते त्यांचे व्यक्तिमत्व, आवड आणि मूडनुसार प्रतिमा तयार करू शकतील. असे केल्याने आपली सुरक्षा आणि गोपनीयता आणखी मजबूत होईल, असा विश्वास WhatsApp ने व्यक्त केला आहे. या संदर्भात व्हॉट्सअॅपने आयओएस आणि अँड्रॉइड या दोन्ही व्हर्जनमध्ये मेसेजिंग App वर त्यांचा प्रोफाईल फोटो किंवा व्हिडिओचा स्क्रीनशॉट देखील दिला नाही.
WhatsApp मध्ये मुख्य एआय चॅटबॉट म्हणून मेटा एआयचा सपोर्ट आधीपासूनच आहे. जो आता मुख्य स्क्रीनवर उपलब्ध आहे. नवीन पाककृती, आहार योजना सेटअप आणि प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी आपण चॅटबॉट वापरू शकता.