मुंबई : खरंतर स्ट्रीट फूड खायला सर्वांनाच आवडत असतं. रोजचं घरचं जेवण खाल्ल्यानंतर अनेकांना काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते पण स्ट्रीट फूड खाताना तुम्ही स्वच्छ आणि चांगले पदार्थ खाताय का ? हे देखील पहायला हवे. कारण मुंबई मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे . शोर्मा खाल्ल्यानंतर अनेक जणांना विषबाधा झाली आहे तर यापैकी एक जण मृत्युमुखी पडला आहे.
ही घटना आहे मुंबईतील मानखुर्द महाराष्ट्रनगर मध्ये घडलेली. प्रथमेश भोकसे वय वर्ष 19 या युवकाला विषबाधेने आपला जीव गमवावा लागला आहे. या परिसरात शोर्माचा स्टॉल एका विक्रेत्याने लावला होता. हा शोर्मा खालेल्या पैकी दहा ते बारा जणांना अचानक उलट्या जुलाब असा त्रास सुरू झाले. तर प्रथमेशला अधिक त्रास जाणवू लागल्याने त्याला शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचार सुरू असतानाच मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे या शोर्मा विक्रेत्याला आता अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानपरिषद निवडणुक : लोकसभेनंतर लगेचच पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका जाहीर