बारामती : बारामतीच्या लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागला आहे बारामतीत भाऊजी विरुद्ध अशी लढत होते आहे ही लढाई जेवढी राजकीय आहे तेवढीच कौटुंबिक देखील बनली आहे.
काका शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर अजित पवार एकटे पडले आहेत आणि केवळ अजित पवारच त्याची पत्नी आणि महायुतीच्या उमेदवार सुलेत्रा पवार यांचा प्रचार करत आहेत यावेळी बारामतीत प्रचार करत असताना ते म्हणाले की, “मित्रांनो ही भावकी-गावकीची निवडणूक नाही. ही देशाच भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. आज एवढा मोठा आपला देश पसरलेला आहे. 135 ते 140 कोटी जनता अठरा पगड जाती इथे राहतात. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापेक्षा जास्त काळ लोटलाय, तरी अजून काही भाग मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. मलाही तुमच्या पाठिंब्याची, तुमच्या पवित्र मताची गरज आहे. बारामतीसाठी 7 तारखेला मतदान आहे. तीन मशीन येणार आहेत. पहिल्या मशीनमध्ये दोन नंबरला सुनेत्रा पवारांच नाव, शेजारी घड्याळ चिन्ह असेल ते बटण दाबा” असं अजित पवार म्हणाले.
” शाहू महाराज छत्रपती यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात हे ऐकून धक्का बसला नाही ! ” संजय राऊत यांची बोचरी टीका
तसेच “आम्ही इतरांसारखे खोटं बोलत नाही. मला निवडून द्या, एमआयडीसी झाली नाही, तर 2019 मध्ये मत मागायला येणार नाही, मग पुन्हा यायच. मी, जर त्या ठिकाणी असतो, तर मला शरमेने लाज वाटली असती. कुठल्या तोंडाने जाऊ मत मागायला. मी शब्दाचा पक्का आहे. सहजासहजी शब्द देत नाही. शब्द दिला, तर कोणाच्या बापाच ऐकत नाही, तो पूर्ण करतो. मी कामासाठी कठोर आहे. जी कामाची माणस आहेत, त्यांना आपलस करण्याचा सुद्धा प्रयत्न करतो” असे देखील अजित पवार म्हणाले आहेत.