सांगली : सांगलीमधून Sangali Crime एक धक्कादायक आघोरी प्रकार उघडकीस आला आहे. हे प्रकरण सुरू झालं होळी पौर्णिमेपासून, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील चिकुर्डे गावाजवळील एका स्मशानभूमीमध्ये या स्मशानभूमीमध्ये एका काळ्या कपड्यांमध्ये बाहुल्या बांधण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या बाहुल्यांवर काही मुला मुलींचे फोटो लावण्यात आले असून त्यावर सुया टोचवण्यात आल्या असल्याचं समजत आहे.
अर्थातच हा एक अंधश्रद्धेचा प्रकार आहे. असे विक्षिप्त प्रकार पाहिल्यानंतर गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. भोळ्या भाबड्या अशिक्षित नागरिकांना हा भयानक प्रकार पाहून त्यांच्यामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं होतं.
दरम्यान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव संजय बनसोडे, कार्यकर्ते निवृत्त उपप्राचार्य जाधव निवृत्त, प्राचार्य डॉक्टर सुदाम माने, विनोद मोहिते यांनी या प्रकाराचा सखोल तपास केला. एकंदरीतच हा जादू तोडण्याचा प्रकार असून निव्वळ अंधश्रद्धा आहे. हे उपस्थित गावकऱ्यांना समजावून सांगितलं आणि त्यानंतर स्मशानभूमीची स्वच्छता केली.
याप्रकरणी संशयतांच्या विरोधात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कारवाईची मागणी देखील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. दोषींना लवकर शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनिसचे प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी केली आहे. गावातील काही मुला मुलींचे फोटो या बाहुल्यांवर लावण्यात आले होते. हा एक धक्कादायक प्रकार नक्कीच आहे. त्यामुळे दोषींवर लवकरात लवकर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे.