मुंबई : भाजपने आपले तीन उमेदवार राज्यसभेसाठी घोषित केल्यानंतर शिंदे गटाने आपला एक उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात उतरवला आहे. शिंदे गटाकडून मिलिंद देवरा Milind Deora यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
Rajya Sabha Elections : राज्यसभेसाठी भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर; भाजपने चौथा उमेदवार देण्याच टाळलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची बैठक पार पडली. यानंतर आज भाजपने आपले तीन उमेदवार आणि शिंदे गटाने आपला एक उमेदवार जाहीर केला आहे. तर अद्याप अजित पवार यांनी आपली उमेदवारी जाहीर केलेली नाही.
कोण आहेत मिलिंद देवरा
मिलिंद देवरा यांनी काही दिवसापूर्वीच शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यापूर्वी गेली 55 वर्ष मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोबत निष्ठेने काम केला आहे. त्याचबरोबर देवरा यांचे वडील देखील काँग्रेसचे दिग्गज नेते होते. दक्षिण मुंबई मतदार संघात मिलिंद देवरा या नावाला प्रचंड वजन आहे. 2004 आणि 2009 या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी विजय मिळवला होता. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. खरंतर लोकसभा निवडणुकीसाठी मिलिंद देवरा यांना शिंदे गट उमेदवारी देईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु आज शिंदे गटाच्या वतीने मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.