मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला Congress एक मोठा धक्का जेष्ठ नेते अशोक चव्हाण Ashok Chavan यांनी दिला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला असून सध्या ते आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दिकी यांनी देखील पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आपला मार्ग बदलला होता. त्यात आता काँग्रेसचे मातब्बर नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने काँग्रेसमध्ये मोठा तडा गेला आहे.
सध्या अशोक चव्हाण यांचा फोन देखील नॉट रिचेबल लागतो आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की गेल्या अनेक दिवसांपासून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत होते. दरम्यान भाजप आता त्यांना नांदेडची उमेदवारी देऊ शकते. अशी चर्चा देखील रंगताना दिसत येत असून पदाधिकाऱ्यांनी भावी खासदार अशा वक्तव्यांचे स्टेटस देखील ठेवले असल्याचे समजते आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असल्या तरीही अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याची अधिकृत माहिती नाही. राजीनामा देण्यासाठी त्यांची आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु राहुल नार्वेकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेतल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हंटले आहे.