मुंबई : आज सकाळी ठाण्यामध्ये रेल्वे सेवा काही काळ ठप्प झाली होती. त्यानंतर आता दादर आणि मुंबईतही वादळी वाऱ्यामुळे मेट्रोसह विमानसेवेतही अडथळे निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांची गती काहीशी मंदावली आहे.
सध्या मुंबईत ढगाळ वातावरण आहे. आज सकाळपासूनच मुंबईतील वातावरण खराब झाले होते. वादळी वारे असल्यामुळे मुंबईतील अनेकांच्या घराचे पत्रे देखील उडून गेल्याचे चित्र पाहायला मिळाला आहे. त्याचबरोबर रस्त्यांवरील जाहिरातींचे बॅनर देखील उडाल्याचा प्रकार घाटकोपर वर्सोवा परिसरात घडला आहे. त्यामुळे अनेक प्रवासी एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवर अडकले असल्याची माहिती मिळते आहे.
मुंबईतील रेल्वे मेट्रो या प्रमुख वाहतुकीच्या साधनांसह विमानसेवेतही हवामानामुळे मोठे अडथळे आल्याचं चित्र आहे. त्यामुळे काही विमानांची उड्डाण देखील ठरलेल्या वेळेत होणार नसल्याचं समजते आहे.