• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, March 4, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Uncategorized

रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, महागाई भत्त्यात वाढ; वाढीव पगार देखील मिळणार

Web Team by Web Team
October 24, 2023
in Uncategorized
0
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, महागाई भत्त्यात वाढ; वाढीव पगार देखील मिळणार
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

यावर्षी रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड होणार आहे. दसरा आणि दिवाळीनिमित्त, रेल्वे बोर्डानं आपल्या लाखो कर्मचाऱ्यांना भेटवस्तू दिली आहे. रेल्वे विभागानं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं महागाई भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्के झाला आहे. हा नवीन भत्ता 1 जुलै 2023 पासून लागू होणार आहे. दरम्यान, 23 ऑक्टोबर 2023 रोजी रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अखिल भारतीय रेल्वे आणि उत्पादन युनिट्सचे महाव्यवस्थापक आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी यांनी निर्णय घेतला आहे की आता डीए 42 टक्क्यांवरून 46 टक्के करण्यात येईल.

वाढीव पगार कधी मिळणार ?

Related posts

Weather Forecast : मुंबईत जनजीवन विस्कळीत; वादळी वारे आणि पावसानं मेट्रोसह विमान सेवेतही अडथळे

Weather Forecast : मुंबईत जनजीवन विस्कळीत; वादळी वारे आणि पावसानं मेट्रोसह विमान सेवेतही अडथळे

May 13, 2024
मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गोंधळ; यादी जाहीर झाली नाही तरीही आमदार संजय गायकवाड यांनी भरला लोकसभेसाठी नामांकन अर्ज

मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गोंधळ; यादी जाहीर झाली नाही तरीही आमदार संजय गायकवाड यांनी भरला लोकसभेसाठी नामांकन अर्ज

March 28, 2024

जुलै 2023 पासून आतापर्यंतची थकबाकी कर्मचाऱ्यांना दिली जाणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाने आपल्या अधिसूचनेत दिली आहे. ही थकबाकी पुढील महिन्याच्या पगारीसह जमा केली जाईल. ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्यात होणारी वाढ जुलै 2023 पासून प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत ही वाढ मिळणे हा कर्मचाऱ्यांचा अधिकार होता. आता कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्क मिळू लागले आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, रेल्वे बोर्डाच्या या निर्णयानंतर रेल्वे कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेमेनचे सरचिटणीस एम राघवैय्या यांनी या निर्णयानंतर म्हटले आहे की, हा निर्णय केवळ महागाई दराच्या आधारावर घेण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांवर महागाईचा कोणताही परिणाम होऊ नये, हा या निर्णयामागचा उद्देश आहे.

दिवाळी बोनसही जाहीर
DA वाढवण्याच्या रेल्वे बोर्डाच्या निर्णयापूर्वी केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसही जाहीर केला आहे. केंद्र सरकारने गट क आणि बिगर गॅझेट गट ब अधिकाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर केला होता. केंद्र सरकारने या बोनसची कमाल मर्यादा 7,000 रुपये निश्चित केली आहे. या बोनससाठी 15,000 कोटी रुपये मंत्रिमंडळाने मंजूर केले आहेत.

मोदी सरकारकडून बोनस जाहीर
पुढील महिन्यात दिवाळी 12 नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे. अर्थ मंत्रालयाने दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नॉन-प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या गट ब आणि गट क अंतर्गत येणारे अराजपत्रित कर्मचारी (नॉन-राजपत्रित कर्मचारी), जे कोणत्याही उत्पादकता लिंक्ड बोनस योजनेंतर्गत समाविष्ट नाहीत, त्यांनाही हा बोनस दिला जाईल. बोनसचा लाभ केंद्रीय निमलष्करी दलातील सर्व पात्र कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे.

Previous Post

DASARA 2023 : दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची व आपट्याच्या पानाची पूजा का केली जाते ?

Next Post

Defence Minister Rajnath Singh : भारत-चीन सीमेवर संरक्षण मंत्र्यांकडून शस्त्रपूजन, जवानांसोबत विजयादशमी साजरी

Next Post
Defence Minister Rajnath Singh : भारत-चीन सीमेवर संरक्षण मंत्र्यांकडून शस्त्रपूजन, जवानांसोबत विजयादशमी साजरी

Defence Minister Rajnath Singh : भारत-चीन सीमेवर संरक्षण मंत्र्यांकडून शस्त्रपूजन, जवानांसोबत विजयादशमी साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

PUNE : साखळी उपोषणात विविध वेशभूषा करून चित्रपट ,नाट्य,लावणी कलाकारांनी मराठा आरक्षणाला दिला पाठिंबा

PUNE : साखळी उपोषणात विविध वेशभूषा करून चित्रपट ,नाट्य,लावणी कलाकारांनी मराठा आरक्षणाला दिला पाठिंबा

2 years ago
धक्कादायक : संगमनेर कारागृहातून कुख्यात आरोपी गज कापून फरार; नगर जिल्ह्यातील दुसरी घटना

धक्कादायक : संगमनेर कारागृहातून कुख्यात आरोपी गज कापून फरार; नगर जिल्ह्यातील दुसरी घटना

2 years ago
Salman Khan : ‘या’ कारणाने सलमान खानच्या घराबाहेर हवेत गोळीबार; लॉरेन्स बिश्नोईच्या गॅंगमधील शुटर कालूने केला गोळीबार; नेमकी घटना काय ? वाचा सविस्तर

Salman Khan : ‘या’ कारणाने सलमान खानच्या घराबाहेर हवेत गोळीबार; लॉरेन्स बिश्नोईच्या गॅंगमधील शुटर कालूने केला गोळीबार; नेमकी घटना काय ? वाचा सविस्तर

2 years ago
Gujarat Gas Leak : वडोदरातील फार्मा फॅक्टरीमध्ये गॅस गळती, 4 कामगार रुग्णालयात दाखल

Gujarat Gas Leak : वडोदरातील फार्मा फॅक्टरीमध्ये गॅस गळती, 4 कामगार रुग्णालयात दाखल

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.