छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर मधून एक मोठी बातमी समोर येते आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या 440 आशा सेविका यांनी संपामध्ये सहभाग घेतला होता. दरम्यान या 440 अशा सेविकांच निलंबन करण्यात आला आहे.
मानधन वाढीच्या मागणीसाठी आणि इतर काही मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आशा स्वयंसेवी संघटनेने राज्यव्यापी संप पुकारला आहे.
दरम्यान आरोग्य विभागास वेठीस धरले तसेच 24 तासात कामावर हजर व्हावे असे नोटीस या सेविकांना देण्यात आली होती. दरम्यान कामांमध्ये कसूर केल्याप्रकरणी या 440 अशा सेविकांत निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या 511 अशा सेविका या संपामध्ये सहभागी झाल्या होत्या. यापैकी 71 अशा सेविका पुन्हा कामावर हजर झाल्या होत्या. त्यामुळे उर्वरित 440 अशा सेविकांचे निलंबन करण्यात आले आहे.










