मुंबई : 57 व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी Actor Ravindra Mahajani यांना मरणोत्तर व्ही. शांताराम पुरस्कार प्रदान करण्यात आला. रविंद्र महाजनी यांचे पुत्र अभिनेते गश्मीर महाजनी यांनी हा सन्मान स्वीकारला आहे.

रवींद्र महाजनी यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी चित्रपट विश्वामध्ये रवींद्र महाजन यांनी आपल्या अभिनय कौशल्याने मोठा काळ चहात्यांच्या मनावर राज्य केले. आज महाराष्ट्र सरकारकडून त्यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल आहे.

रवींद्र महाजनी यांच्यासह 2021 साठी जेष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण आणि 2022 साठी जेष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांना मी शांताराम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.