गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल झालेला दिसत आहे. काही भागात थंडी तर काही भागात उन्हाचे चटके अद्यापही बसत आहेत. अशातच आता पुणे हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा परिणाम राज्यासह देशातील हवामानावर होत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील काही भागात पुढील काही दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या जिल्ह्यात दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता :
▪️राज्यात सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत पुढील दोन दिवस पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच राज्यातील उर्वरित भागात हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज आहे.