उत्तरकाशी : Tunnel Accident Video उत्तरकाशीतील सिल्क्यरा Uttarkashi Silkyara 41 मजूर 12 नोव्हेंबरपासून अडकले आहेत. उत्तराखंड Uttarakhand मधील बोगदा दुर्घटनेत Tunnel Accident अडकलेल्या मजुरांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. गेल्या 10 दिवसांपासून 41 कामगार बोगद्यामध्ये अडकून पडले आहेत. बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात मोठी दुर्घटना Tunnel Accident घडली, यामुळे 41 मजूर आतमध्ये अडकले आहेत. स्थानिक प्रशासनासह केंद्रीय यंत्रणा या मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

दरम्यान या मजुरांना पाईपद्वारे अन्न आणि ऑक्सिजन पुरवठा सुरु आहे. आता या पाईपद्वारे इंडोस्कोपिक कॅमेरा पाठवून कामगारांची परिस्थिती जाणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे बोगद्याच्या आतील मजुरांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
उत्तरकाशीमधील बोगद्यामध्ये मागीत 10 दिवसांपासून 41 मजूर अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी 200 हून अधिक लोकांची टीम 24 तास बचावकार्य राबवत आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सोमवारी पहिल्यांदाच अन्न पाठवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, पहिल्यांदाच अडकलेल्या मजुरांसाठी खिचडी पाठवण्यात आली आहे.

दरम्यान या कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यास आणखी पाच ते सहा दिवस लागण्याची शक्यता मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी वर्तवली आहे. बोगद्यातील माती पुन्हा खाली आल्याने बचावकार्य लांबलं आहे. दुसऱ्या चार बाजूने उभे आणि तिरप्या मार्गाने बोगदा खणून मजुरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे.