TCS कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे. अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या 2000 हून अधिक कर्मचाऱ्यांना बदलीच्या नोटिसा पाठवल्या आहेत. नोटीसनुसार या कर्मचाऱ्यांना 15 दिवसांत रुजू व्हावे लागणार आहे.
दिलेल्या तारखेपर्यंत कर्मचारी जर जॉइनिंगच्या ठिकाणी पोहोचले नाहीत तर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे कंपनीने म्हटले आहे. TCS ने कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये कंपनीने प्रवास आणि राहण्याचा खर्च कंपनी उचलणार असल्याची माहिती दिली आहे.
हे वाचलेत का ? National Epilepsy Day 2023 : Epileptic Attack आलेल्या रुग्णाला कशी मदत करावी, हि प्राथमिक माहिती असल्याचं हवी !
दरम्यान 180 हून अधिक कर्मचार्यांनी युनियनशी संपर्क साधला असल्याची माहिती समोर येते आहे. आणि कंपनीने पाठवलेल्या या अचानक ईमेलबद्दल नाराजी व्यक्त केली. कंपनीने कोणतीही योग्य माहिती आणि सल्लामसलत न करता असा निर्णय घेतल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळं त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.