Skin Care Tips : प्रत्येक ऋतुमानानुसार Skin Care Tips त्वचेवर देखील परिणाम होत असतो. सर्वात जास्त उन्हाळ्यामध्ये त्वचेचे नुकसान होत असते. त्यामुळे काही घरगुती उपायांच्या मदतीने आपण उन्हाळ्यातील टॅंनिंग पासून त्वचेची रक्षा करू शकतो. तर पाहूयात असे सोपे उपाय.
भरपूर पाणी प्या
उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी पिणे खूप आवश्यक आहे. यामुळे शरीर आणि चेहऱ्याच्या त्वचेमधला ओलावा टिकून राहण्यास मदत होते आणि शरीर डिहायड्रेट होत नाही. शरीरातील अनावश्यक घटक युरेन आणि घामावाटे निघून जातात. त्यामुळे तहान लागली नाही तरी थोडे थोडे पाणी पीत राहावे.
लिंबू पाणी पिणे
सी विटामिन युक्त फळांचा रस किंवा रोज अर्धा ग्लास लिंबू पाणी प्यायल्याने देखील त्वचेमध्ये चकाकी कायम राहते.
मुलतानी माती – चंदन पावडरचा लेप लावणे
त्वचेला थंडावा देण्यासाठी मुलतानी माती आणि चंदन पावडर चा लेप लावावा हा लेख लावताना त्यामध्ये रोज वॉटर किंवा दीडशे दूध घालून 15 मिनिट हा चेहऱ्यावर ठेवावा त्यामुळे थंडावा मिळतो आणि कांती देखील सुधारते
कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे
कडक उन्हात बाहेर पडने जास्त करून टाळावे. जर पडणे आवश्यकच असेल तर योग्य सनस्क्रिन आणि गॉगल, स्कार्फचा वापर अवश्य करावा.
आंबे हळद लावणे
आंबे हळद, निरसे दुधामध्ये एकत्र करून हा लेप चेहऱ्यावर लावावा. यामुळे टॅनिंग दूर होण्यास उपयोग होतो.
जमेल तेवढ्या वेळा चेहऱ्यावर गार पाण्याचे शिपके मारणे. याने देखील चेहऱ्यावरील घाण निघून जाऊ शकते. तसेच झोपताना डोळ्यांवर रोज वॉटर आणि एलोवेरा जेल एकत्र करून कापसाच्या पट्ट्या डोळ्यावर ठेवाव्यात. त्यामुळे डोळ्यांना थंडावा तर मिळतोच तसेच डोळ्याखाली येणारी काळी वर्तुळ देखील दूर होतात.