Shocking video viral: इंटरनेटच्या जगात दिवसागणिक लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडिओ मनोरंजन करणारे तर काही व्हिडिओ विचार करायला भाग पाडणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक मगरीला पकडून तिच्यासोबत फोटो काढताना दिसत आहेत. इतक्यात हा विशालकाय प्राणी भडकतो आणि या लोकांवर हल्ला करतो. (Shocking video viral crocodile attacks while people taking pictures with her video viral trending)

नेमकं त्या व्हिडिओत काय?
त्या व्हिडिओत चार ते पाच लोक एका महाकाय मगरीला पकडून तिच्यावर बसले आहेत. मगरीला पकडण्यामागचा उद्देश असा की, त्यांना त्या मगरीसोबत फोटो काढायचा असतो. पण इतक्यात मगर चिडते आणि जवळ असणाऱ्या लोकांवर हल्ला करते. या हल्ल्यामध्ये अद्याप कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. मगरीला चिडलेलं पाहून तिथून लोकं जीव वाचवून इथून पळताना दिसतात. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरत नाहीये.
पाहा हा व्हिडिओ
काही लोकांना हा व्हिडिओ खूप मजेदार तर काहींना धोकादायक वाटत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @crazyclipsonly नावाच्या युजरने शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 3 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
व्हायरल होणाऱ्या त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. लोक या व्हिडिओला खूप धोकादायक देखील म्हणत आहेत. या पोस्टवर एका युजरने कमेंट केली ‘यांना नक्की काय करायचं होतं?’ दुसऱ्या युजरने लिहिलं की, ‘चुकूनही अशा प्राण्यांच्या जवळ जाऊ नका.’ त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिलं की, ‘खूप भयानक व्हिडिओ.’
आणखी वाचा – Crime News : अमेरिकेत जाऊन आजी-आजोबांची हत्या करणारा गुजराती तरुण पोलिसांच्या ताब्यात
व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु
धोकादायक प्राण्यांच्या जवळ जाणं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासारखं आहे असं आपल्या वारंवार सांगितलं असताना ही आपण तेच करतो. सोशल मीडियाच्या जगात लोकांना आपण काय करु शकतो हे दाखवायचं असतं पण अशावेळेस आपल्या वागण्याने कोणाला दुखापत होईल हे मात्र ते विसरुन जातात. लोक मगरी सारख्या प्राण्यांच्या जवळ जायलाही घाबरतात. असे प्राणी क्षणार्धात पलटवार करण्यात माहीर असतात. तरी ही त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून एका फोटोसाठी मगरीला पकडलं होतं. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु आहे.