नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका आणि इजिप्तचा दौरा आजपासून सुरू झालाय. (PM Modi US visit) हा दौरा पाच दिवसांचा असून 20 ते 25 जून दरम्यान होणारे. राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी मोदींना अमेरिका दौऱ्यासाठी आमंत्रित केलंय. (Prime Minister Narendra Modi US State Visit) या दौऱ्यानंतर, पंतप्रधान मोदींचा महान लोकांच्या यादीत समावेश होईल. पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याचे महत्त्वपूर्ण परिणाम होतील. आतापर्यंत कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने दोनदा संबोधित केलेले नाही. अमेरिकन काँग्रेसला दोनदा संबोधित करणारे फार कमी लोक आहेत. यापुर्वी विन्स्टन चर्चिल आणि नेल्सन मंडेला यांना आमंत्रित केलं होतं. यांनी यूएस काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला दोनदा संबोधित केलंय. हा दौरा अनेक अर्थांनी खास असणारे. यादरम्यान भारत आणि अमेरिका यांच्यात सहा मोठे संरक्षण करार होणारेत. यामध्ये ड्रोन, स्ट्रायकर आर्मर्ड वाहने आणि जेट इंजिन्सवरील करारांचा समावेश आहे.
पंतप्रधान मोदींचा राजकीय दौरा कसा असेल? (PM Modi US visit Schedule)
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची सुरुवात आजपासून न्यूयॉर्कमध्ये झालीये. न्यूयॉर्कमध्ये मोदी 21 जून रोजी संयुक्त राष्ट्र मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याचे नेतृत्व करतील. त्यानंतर, पीएम मोदी वॉशिंग्टन डीसीला जातील. तिथे 22 जून रोजी व्हाईट हाऊसमध्ये त्यांचे स्वागत केले जाईल. येथे सुरू असलेल्या उच्चस्तरीय संवादाचा भाग म्हणून राष्ट्रपती बायडन यांच्याशी चर्चा करतील. त्याच दिवशी संध्याकाळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ बायडनद्वारे राजकीय भोजनाचे आयोजन केले जाईल.
पंतप्रधान मोदी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार
22 जून रोजी यूएस काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करण्यासाठी रिपब्लिकन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह केविन मॅककार्थी आणि डेमोक्रॅटिक सिनेटचे अध्यक्ष चार्ल्स शूमर यांच्यासह इतर यूएस काँग्रेस नेत्यांनीही पंतप्रधान मोदींना आमंत्रित केले आहे. दुसऱ्या दिवशी ते उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला उपस्थित राहतील.
एलॉन मस्क सोबत भेट (PM Modi meeting Elon Musk)
पंतप्रधान मोदी सीईओ, व्यावसायिक आणि इतर भागधारक तसेच भारतीय डायस्पोरा यांच्या भेटीही घेणारेत. अमेरिका दौऱ्याची सांगता झाल्यानंतर पंतप्रधान मोदी 24 ते 25 जून या कालावधीत इजिप्तला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी एलॉन मस्क, खगोलभौतिकशास्त्रज्ञ नील डीग्रासे टायसन, ग्रॅमी पुरस्कार विजेते भारतीय-अमेरिकन गायक फालू (फाल्गुनी शहा), मायकेल फ्रॉमन डॅनियल रसेल, एल्ब्रिज कोल्बी, डॉ. पीटर आग्रे, पॉल रोमर, निकोलस नसीम तालेब, रे डालियो, जेफ स्मिथ, चंद्रिका टंडन आणि डॉ. स्टीफन क्लास्को यांची भेट घेणारे.