भोपाळ : अभिनेता नितीश भारद्वाज Nitish Bhardwaj यांनी टेलिव्हिजनच्या जगतामध्ये भगवान श्रीकृष्णांची अशी भूमिका साकारली आहे की त्यांना दुसऱ्या रूपात पाहणं कदाचित कठीण होईल. सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील महाभारतान त्यांना थेट पोलिसांची मदत घ्यायला आता भाग पाडले. त्यांनी त्यांची दुसरी पत्नी आयएएस अधिकारी स्मिता घाटे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीश यांचं हे दुसरं लग्न आहे. 2009 साली त्यांनी स्मिता घाटे यांच्यासोबत दुसरं लग्न केलं होतं. दहा वर्ष त्यांचा संसार चालला. या दांपत्याला दोन जुळ्या मुली आहेत. 2019 मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान आपल्या मुलींना भेटू देत नाही आणि आपल्याला मानसिक त्रास देत असल्याची तक्रार नितेश भारद्वाज यांनी भोपाळच्या पोलीस आयुक्तांकडे पत्रव्यवहार करून केली आहे. भोपाळच्या पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.