Worldcup 2023 : पहिल्या सामन्यात कठीण परिस्थितीतून लढत जिंकणारा भारतीय संघ बुधवारी विश्वचषकातील आपल्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा सामना करणार आहे. वेगवेगळ्या परिस्थितीनुसार स्वत:ला जुळवून घेण्याचे आव्हान भारतासमोर असेल, असे कर्णधार रोहित शर्माने सांगितले होते. चेपॉकच्या धिम्या व फिरकीला अनुकूल अशा खेळपट्टीनंतर आता भारतीय संघ फिरोजशाह कोटलावर खेळणार आहे.
