Ind vs Pak world cup 2023 : आता वर्ल्डकपच्या तिसरी फेरी सुरू झाली असून या फेरीत उद्या म्हणजेच 14 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघांचे चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे हा सामना अटीतटीचा होणार आहे. तसेच या सामन्यात जो संघ बाजी मारेल त्याची वर्ल्डकपमधील पुढची वाटचाल सोपी होणार आहे.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये महत्वाचा असा समजला जाणारा दुसरा टप्पा संपुष्टात आला असून, यामुळे काही संघांत आनंदाचे वातावरण आहे. तर काही संघ त्यांच्या कामगिरीवर असमाधानी आहेत. आतापर्यंतची सर्व संघांची कामगिरी पाहिली तर यात न्यूझीलंडचा संघ या यादीत नंबर 1 ला आहे. यानंतर पाहिलं तर भारत या यादीत 2 नंबरला असून पाकिस्तानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.










