नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत, हा सण साजरा करण्याची सर्वत्र तयारी सुरू आहे. तिळगूळ वाटून एकमेकांना शुभेच्छा देणे, पतंग उडवणे, हळदी कुंकूचा कार्यक्रम त्यासाठी वाण देण्याची तयारी या सगळ्या गोष्टींचा प्रचंड उत्साह असतो. याचबरोबर बोरनहानीचा देखील कार्यक्रम केला जातो. नेमका बोरन्हाण का आणि कसे केले जाते जाणून घेऊया.
लहान मुलांचे बोरन्हाण का घालतात ?
▪️ मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिला संक्रांतीला किंवा मूल पाच वर्षांचं होईपर्यंत येणाऱ्या संक्रांतीला लहान मुलांना बोरन्हाण घातलं जातं. शिशूसंस्कार म्हणून लहान मुलांना बोरन्हाण घालण्यात येतं. लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरन्हाण घालण्याची परंपरा आहे, असं म्हटलं जातं.
▪️ बोरन्हाणसंदर्भात अशीही एक आख्यायिका आहे की, पूर्वी करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये, यासाठी तेव्हापासून बोरन्हाण करण्याची पद्धत पडली आहे.
दरम्यान, यंदा 15 जानेवारी ते 16 फेब्रुवारी 2024 या काळात बोरन्हाण करता येईल. पाच वर्षापर्यंतच्या मुलांपर्यंत हे बोरनाहं घातले जाते. यामध्ये माप किंवा कलशातून मुरमुरे, चॉकलेट , बिस्किट्स, बोर , हरबरा, गाजर , ऊस यांचे बारीक तुकडे करून याने डोक्यावर घातले जाते. मुलांना त्यानंतर खाऊ आणि खेळांचे देखील आयोजन केले जाऊ शकते.