`मुंबई : एक फेब्रुवारी 1957 साली काकूबाई श्रॉफ यांच्या घरी जयकतीशन श्रॉफ या गोंडस मुलाचा जन्म झाला. जयकतीशन श्रॉफ ते बॉलीवूडचा 80 च्या दशकातला स्टाईल आयकॉन अभिनेता जग्गू दादा बॉलिवूडला कसे मिळाले ही खास गोष्ट वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात.
काकू भाई श्रॉफ यांना खरंतर दोन मुलं होती. परंतु समुद्रामध्ये बुडून जॅकी श्रॉफ
यांच्या भावाला अकाली मृत्यू आला.
या घटनेने संपूर्ण कुटुंब शोकात बुडून गेल. त्यानंतर काही कारणाने जग्गू दादांना अकरावी मध्येच शिक्षण देखील थांबवावे लागले. विशेष म्हणजे जग्गू दादांनी अवघ्या एक रुपयासाठी स्टैंडवर शेंगदाणे देखील विकले होते.
हळूहळू दुःख आणि त्रासातून ते बाहेर पडणार होते ती सुरुवात झाली…! ट्रॅव्हल एजंट म्हणून ते स्टॅन्डवर उभे होते. यावेळी जाहिरात कंपनीतील एका व्यक्तीने त्यांना मॉडलिंग करणार का ? असं विचारलं आणि त्यांचं आयुष्य तिथूनच पलटणार होतं.
`उंचपुऱ्या, रुबाबदार व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना फोटोशूटच काम मिळालं. त्यांनी जाहिरातीसाठी केलेलं हे फोटोशूट मिळालं ते सुभाष घाई यांना, आणि त्यानंतर जग्गू दादांनी बॉलीवूडमध्ये एन्ट्री करून 80 च्या दशकातला स्टाईल असलेल्या हिरोचा किताब मिळवला.आजही त्यांचे अनेक चाहते आहेत.