मुंबई-गोवा महामार्ग : कोकणप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुर्दुगकडे जाणारी एक लेन आज वाहतुकीसाठी खुली होतेय. या एका लेनमधून प्रथमतः हलक्या वाहनांना सोडलं जाणार आहे. कशेडी घाटातील वाहतूक बऱ्यापैकी सुरळीत होणार आहे.