भारतीय निवडणूक आयोग बॉलीवूड अभिनेता राजकुमार रावची 26 ऑक्टोबर 2023 रोजी नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती करणार आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अभिनेता राजकुमार राव यांची राष्ट्रीय आयकॉन म्हणून नियुक्ती करणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
येत्या 26 ऑक्टोबरला गुरुवारी यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात येईल. भारतातील पाच राज्यांमधील 161 दशलक्षाहून अधिक लोक पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करणार आहेत. अशी घोषणा भारताच्या निवडणूक आयोगाने या महिन्याच्या सुरुवातीला केली. आता विधानसभा निवडणुकीत मदतान करण्याचं आवाहन करताना अभिनेता दिसणार आहे.
https://x.com/ANI/status/1717081682308911141?s=20
विधानसभेच्या छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. मध्य प्रदेश आणि तेलंगणामध्ये 17 आणि 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राजस्थानमध्ये आधी 23 नोव्हेंबरला मतदान होणार होते. पण आता ते 25 नोव्हेंबरला होणार आहे. तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
नॅशनल आयकॉन लोकांना मतदानाबाबत जागरूक करतात. त्यांच्या सांगण्यावरुन जास्तीत जास्त मंडळी मतदान करतात. राजकुमार राव आधी ऑगस्टमध्ये निवडणूक आयोगाने माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला आपला नॅशनल आयकॉन बनवले होते. भारतात पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. अधिकाधिक लोकांनी मतदानात सहभागी व्हावे अशी निवडणूक आयोगाची मानस आहे.