Darshana Pawar Murder Case : मुंबईतील मीरा रोडवरील सरस्वती मर्डर केस सुरू असतानाच महाराष्ट्रातील दर्शना पवार मर्डर केस समोर आलीये. या ताज्या मर्डर केसमधील आरोपीला पोलिसांनी अटक केलीये. राहुल हंडोरे असं आरोपीचं नाव आहे. हे दोघही आधी एकमेकांचे क्लासमेट होते. त्यानंतर दोघही रिलेशनशीपमध्ये आलेत. ते लहानपणापासून एकमेकांना ओळखत असल्याचं देखील पोलिसांनी सांगितलं. पदवीनंतर दोघांनी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथून स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात येण्याचं ठरवल होतं.
लग्न करण्यास नकार दिल्यामुळे हत्या (Why Darshana Pawar was killed)
महाराष्ट्रातील दर्शना पवार खून प्रकरणात पोलिसांनी आरोपी राहुल हंडोरे याला अंधेरी रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली. पुण्याचे एसपी अंकित गोयल यांनी सांगितलं की, अधिकारी झाल्यानंतर दर्शनाने राहुलपासून स्वतःला दूर केले आणि त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. यामुळे त्याने खून केला. या प्रकरणाच्या तपासासाठी 5 पोलिसांची टीम तयार करण्यात आलीये. त्यामध्ये 25 पोलिस हत्येचे गूढ शोधण्यात गुंतले आहेत. आरोपी विरोधात वेल्हे पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केलांय.
12 जूनला सकाळी दोघही दुचाकीवर दिसले होते
विशेष म्हणजे एमपीएससी परीक्षेत तिसरा क्रमांक मिळवणारी दर्शना पवार ही 12 जून रोजी बेपत्ता झाली होती.(Darshana Pawar MPSC) 12 जूनला सकाळी दोघही दुचाकीवर दिसले होते. राहुलसोबत राजगड किल्ल्यावर जात असल्याचं तिने तिच्या मित्रांना आणि कुटुंबियांना सांगितलं होतं. यानंतर 18 जून रोजी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती वेल्हा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांना तपासात समजले की, तिचे नाव दर्शना पवार असे आहे.
कोण आहे राहुल हंडोरे? (Who is Rahul Handore)
राहुल हंडोरे हा नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील शहा गावचा रहिवासी आहे. त्याने बीएससीपर्यंतच शिक्षण घेतलंय. पुण्यात राहून तो एमपीएससीची तयारीही करत होता. दर्शना आणि राहुलची मैत्री चांगली होती. दोघेही गेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांना ओळखत होते. दोघही एकत्र ट्रेकिंगला गेले होते. त्याने 12 जूनला दर्शना पवार यांची हत्या करून मृतदेह उंच डोंगरावरून खाली फेकून दिला.