अयोध्या : आज अखेर तो दिवस उजाडला आहे. पाचशे वर्षानंतर श्री राम लल्ला पुन्हा एकदा अयोध्येत परतत आहेत. श्रीरामांचे स्वागत आज फक्त देशातूनच नाही तर देशाबाहेर देखील आनंदोत्सव साजरा केला जातो आहे. आज संपूर्ण देशात दिवाळी पुन्हा एकदा साजरी होणार आहे. काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मुहूर्तानुसार सुरुवात होते आहे.
किती वाजता केली जाणार प्राणप्रतिष्ठा
आज सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी श्रीराम लल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा दिवस निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार सर्व तयारी पूर्ण झाली असून आज अभिजात मुहूर्तावर दुपारी १२ वाजून 29 मिनिटे आणि आठ सेकंद ते बारा वाजून तीस मिनिटे 32 सेकंदापर्यंत ही प्राणप्रतिष्ठा पूजा संपन्न होणार आहे. प्रभू रामांच्या मूर्तीचा अभिषेक पौष महिन्याच्या बाराव्या दिवशी अभिजीत मुहूर्त, इंद्र योग, मृगाशिरा नक्षत्र, मेष लग्न आणि वृश्चिक नवमशामध्ये. ही शुभ वेळ 12:29 मिनिटे आणि 08 सेकंद ते 12:30 मिनिटे आणि 32 सेकंदांपर्यंत आहे.
https://www.facebook.com/share/v/zGNYZMfLTMUQEk4p/?mibextid=qi2Omg