मुंबई : एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना अभिजीत विचुकले म्हणाले की, ” वयाच्या विसाव्या वर्षापासून मी साहित्य मनोरंजन राजकारण या क्षेत्रात कार्यरत आहे. विविध क्षेत्रातील माझं योगदान लक्षात घेऊन मला नुकतीच डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली आहे. तर आता आम्ही डॉक्टर अभिजीत बिचुकले असे लिहू शकतो असे अभिजीत बिचुकले यांनी म्हटले आहे.
अभिजीत बिचुकले यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड यांच्याकडून त्यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली आहे. बीचुकले यांनी सांगितले की, मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड हे नामांकित लोकांचा शोध घेऊन त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करतात. मराठी मनोरंजन क्षेत्रातील माझ्या कामगिरीची दखल घेतल्याबद्दल मी चुकले यांनी आभार व्यक्त केले आहेत.

यावेळी बीचुकले यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची भूमिका नेमकी काय असेल हे देखील ते लवकरच स्पष्ट करणार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, मी निवडणूक लढवणार आहे. माघार घेणार नाही. बेडूक इकडून तिकडे उड्या मारतात. महाराष्ट्रात मी एकदा ठरवले की ठरवले. निवडणूक लढवणारच असे देखील बिचुकले यांनी म्हटले आहे. त्यामुळे बिचुकले आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात देखील दिसणार असं चित्र आहे.