Mumbai Trans Harbour Link: मुंबईकरांसाठी आंनदाची बातमी! मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी नवनवीन वाहतूक सेवेवर भर दिला जात आहे. मुंबईतील बहुप्रतीक्षीत असा मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक (MTHL) पूल पुढच्याच महिन्यात नागरिकांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यातच हा पुल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. हा पुल वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर मुंबई ते नवी मुंबई या दोन शहरातील अंतर कमी होणार आहे. त्याचबरोबर मुंबईहून पुणे गाठणे सोप्पे होणार आहे. जाणून घेऊया कसा आहे मार्ग. (mumbai trans habour link mumbai to pune in 90 minutes)

मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक हा समुद्रावर उभारण्यात आला असून हा पूल 22 किमी लांब आहे. पुलाचे 98 टक्के काम पूर्ण झाले आहे. 22 किमीपैकी 16 किमीपर्यंतचा भाग समुद्रावर बांधण्यात आला आहे. 25 डिसेंबर रोजी मुंबई ट्रान्स लिंक प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. एमटीएचएल पुल सुरू झाल्यानंतर मुंबईहून-नवी मुंबईपर्यंत पोहोचणे सोप्पे होणार आहे. त्याचबरोबर वाहतुक कोंडीपासूनही सुटका होणार यामुळं प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक पुल सुरू झाल्यानंतर मध्य मुंबईतून सेवरी ते नवी मुंबईच्या चिरलेपर्यंतचा प्रवास अगदी 15 ते 20 मिनिटांत होणार आहे. एमटीएचएल पुल सुरू झाल्यानंतर मुंबई आणि पुणेपर्यंतचा प्रवासही सोप्पा आणि जलद होणार. लोणावळा- खंडाळा आणि मुंबईपर्यंतचा प्रवास 90 मिनिटांत होण्याची शक्यता आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकची वैशिष्ट्ये
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकसाठी 18 हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. देशातील सर्वात लांब समुद्री पूल मुंबई ट्रान्स हार्बर लिंक 16.5 किमी लांब डेक असलेला हा भारतातील पहिला पूल असणार आहे. पुलाचा सर्वात मोठा हिस्सा समुद्रावर असल्याने आपत्तकालीन मदत लवकर मिळावी या हेतूने योजना बनवण्यात आली आहे.