लक्षद्वीप : समुद्रकिनारी कोणाला फिरायला आवडत नाही ? Lakshadweep सुट्या म्हंटल कि फक्त नेमकं कोणत्या समुद्रकिनारी जायच असा प्रश्न पडतो. सध्या मालदीव या पर्यटन स्थळावरून निर्माण झालेला वाद, त्यानंतर हजारोंच्या संख्येने रद्द झालेले बुकिंग यातून भारतीयांना मालदीव हे फिरायला जाण्याचे आवडते ठिकाण होते हे लक्षात येत. सामान्यच नाही तर अनेक सेलिब्रिटी देखील फिरायला जाण्यासाठी मालदीवला जात होते. पण आता मालदीव ऐवजी भारतीयांच्या आवडीच्या पर्यटन स्थळांमध्ये दाखल झाले आहे ते लक्षद्विपचे नाव…! चला तर जाणून घेऊयात लक्षद्वीप विषयी…
सध्या देशात नाही तर जगभरात लक्षद्वीपची चर्चा होत आहे. जर तुम्ही लक्षद्वीपला जाण्याचा विचार करत असाल तर येथे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकता.
तुम्ही जर विमानाने लक्षद्वीपला जायचा विचार करत असाल तर तुम्हाला कोचीच्या अगाट्टी विमानतळासाठी विमानाचे तिकीट बुक करावे लागेल. कोची ते लक्षद्वीप बेटापर्यंतचे हे एकमेव विमानतळ आहे.
अगत्ती बेटावर पोहोचल्यानंतर, तुम्ही येथून बोटीने किंवा हेलिकॉप्टरने सहजपणे इतर बेटांवर जाऊ शकता. अनेक विमान कंपन्या लक्षद्वीप बेटावर थेट विमानसेवा देत आहेत. दिल्ली ते लक्षद्वीप फ्लाइट तिकिटाचे भाडे प्रत्येकी 10 हजार रुपयांपासून सुरू होते.
तुम्ही जर लक्षद्वीपसाठी जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही एक महिना अगोदर फ्लाइट तिकिट बूक करावी लागेल. आधी बुकिंग केल्यास तुम्हाला ते स्वस्तात मिळेल. प्रवास खर्च वगळता तुम्ही 25,000 ते 30,000 (प्रति व्यक्ती) रुपयात लक्षद्वीप फिरु शकता.