दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये आज दिनांक 3 ऑक्टोबरला भूकंपाचे दोन जोरदार धक्के बसले आहेत. भूकंपाच्या या धक्क्यामुळे बराच वेळ जमीन हजरत असल्याने नागरिकांनी घरातून आणि ऑफिसमधून बाहेर धाव घेतली आहे.
आज दिल्ली एनसीआर परिसरामध्ये आज भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल एवढी मोजण्यात आली आहे. भूकंपाचा पहिला हादरा दुपारी अडीच च्या सुमारास जाणवला या भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक सहा इतकी होती तर या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये पृथ्वीच्या दहा किलोमीटर खोल होता.
https://x.com/NCS_Earthquake/status/1709136305832226934?s=20
त्यानंतर अर्धा तासाच्या आत दुसरा भूकंपाचा धक्का जाणवला या भूकंपाची तीव्रता 6.2 एवढी मोजण्यात आली.