महाराष्ट्र : ट्रान्सपोर्ट युनियनच्या Transport Union वतीने संप Strike पुकारण्यात आला आहे. कालपासूनच हा पासून हा संप सुरू झाला असून खाजगी बससह इंधन वाहतूक करणारे टँकर चालक देखील संपावर आहेत. दरम्यान या संपामुळे पेट्रोल वाहतुकीवर देखील परिणाम होणार आहे. यामुळे पेट्रोल भरण्यासाठी देखील नागरिक गर्दी करत आहेत . त्याचबरोबर भाजीपाला आणि नागरिकांच्या रोजच्या व्यवहारांवर याचा परिणाम होताना दिसून येऊ लागला आहे. दरम्यान स्कूलबस चालकांनी या संपामध्ये सहभाग घेऊ नये, अन्यथा कारवाईबाबत वेगळा विचार केला जाईल. अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खडसावले आहे.
हिट अँड रन कायद्याविरोधात आजपासून ट्रान्सपोर्ट युनियनने संप पुकारला आहे. दरम्यान खाजगी बस चालकांसह इंधन वाहतूक करणारे टँकरचे चालक देखील संपावर असल्यामुळे पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध होत नसल्याकारणाने स्कूल बस देखील संपात सहभागी होणार असल्याचे म्हटले जात होते. दरम्यान स्कूल बस बंद ठेवण्याचा मालक संघटनांनी घेतलेल्या निर्णयावर दीपक केसरकर यांनी थेट इशारा देत म्हटले आहे की, ” स्कूलबस चालकांनी संपामध्ये सहभागी होऊ नये, अन्यथा कारवाईबाबत वेगळा विचार केला जाईल. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असं कोणीही वागू नये. तसेच उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.