महाराष्ट्र : cसध्या उन्हामुळे सर्वजण चांगलेच त्रासले आहेत. तप्त जमिनीवर यावर्षी मात्र लवकर पावसाचे थेंब बरसणार असल्याची दिलासादायक माहिती हवामान खात्याने दिली आहे. केरळमध्ये मान्सून 30 मे रोजीच दाखल झाला असून तमिळनाडूमध्ये देखील मान्सून हजेरी लावली आहे. अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, साधारणपणे 15 जून पर्यंत मध्य प्रदेशमध्ये मान्सून दाखल होऊन 20 जून पर्यंत उत्तर प्रदेश पर्यंत पोहोचेल त्यामुळे यावर्षी मान्सूनची हजेरी वेळेत लागणार आहे.
दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मुंबईत येत्या काही दिवसात जोरदार पावसाची शक्यता असून रायगड जिल्ह्यात पुढील 48 तासात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.