मुंबई : या वेळची लोकसभा निवडणूक Lok Sabha elections ही जागा वाटपाच्या तिढ्यावरून प्रचंड गाजते आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीही बाजूला जवळपास सारखीच परिस्थिती आहे. आता प्रश्न निर्माण झाला आहे. तो म्हणजे कल्याण Kalyan Lok Sabha Constituency लोकसभा मतदारसंघाचा… कल्याण लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे मैदानात उतरणार आहेत. स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची ही जागा घोषित केली आहे.
एकीकडे स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. पण दुसरीकडे भाजपकडूनच त्यांच्या उमेदवारीला मोठा विरोध होताना दिसून येतो आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला मोठा विरोध केला आहे. त्याचबरोबर गायकवाड यांच्या कार्यालयात भाजप श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराला मैदानात उतरणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे गणपत गायकवाड, पदाधिकारी आणि इतर कल्याण लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः भाजप श्रीकांत शिंदे यांना पूर्ण पाठिंबा देऊन मदत करणार असे घोषित करत आहेत. तर दुसरीकडे गणपत गायकवाड यांनी श्रीकांत शिंदे यांना कोणतही सहकार्य करायचं नाही अशी बंडाची भूमिका घेतली आहे. आता देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मध्यस्थी करून गणपत गायकवाड यांची मनमर्जी राखणार का ? आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते हे महायुती धर्म पाळणार का ? हे लवकरच समजेल.
या निवडणुकीमध्ये आता महायुतीच्या वतीने शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे यांना अधिकृत उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिंदे विरुद्ध दरेकर असा सामना कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये रंगणार आहे.