बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे (Belgaum Cantonment Board) सीईओ के. आनंद (CEO K. Anand) यांनी आपल्या सरकारी बंगल्यात (Government Bungalow) आत्महत्या Suicide केल्याची घटना शनिवारी (ता. २५) घडली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या घटनेने बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये खळबळ उडाली आहे.
हे वाचलेत का ? Deputy Chief Minister Ajit Pawar : एकही शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही यादृष्टीने नवीन आराखडे तयार करा
पोलिस उपायुक्त रोहन जगदीश यांनी दिलेल्या माहिती नुसार, घटनेची तपासणी सुरु असून आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट झालेले नाही. मूळचे तमिळनाडूमधील चेन्नईचे असणारे के. आनंद हे इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस अधिकारी म्हणून गेल्या दोन वर्षांपासून बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य करत होते. के. आनंद हे गुरुवारी सायंकाळपासून घरातच होते. शनिवारी सकाळी घरचा दरवाजा उघडला नाही, त्यामुळे याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा खोलला असता घरामध्ये के. आनंद यांचा मृतदेह आढळून आला.
हे वाचलेत का ? PAKISTAN FIRE : कराची शॉपिंग मॉलला लागलेल्या भीषण आगीत 11 जणांचा मृत्यू; इमारतीत अजूनही 42 जण अडकल्याची भीती
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डात केंद्रीय तपास यंत्रणेकडून CBI चौकशी सुरु होती. बोर्डाच्या भरती प्रक्रियेत घोटाळा केला असल्याचा आरोप झाला होता. ही चौकशी सुरु असतानाच बोर्डाच्या मुख्य अधिकाऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.