पुणे : पुण्यातील ISIS दहशतवादी प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी पुणे पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना पकडलं होतं. या दोन दहशतवाद्यांनी टेरर फंडिंगसाठी साताऱ्यामध्ये एका सोन्याच्या दुकानांमध्ये लुटमार केली होती. आणि येथूनच लाखो रुपयांचा फंडिंग करण्यात आलं असल्याचं या दहशतवाद्यांनी कबूल केल आहे.
18 जुलै रोजी पुणे पोलिसांनी मोहम्मद इमरान मोहम्मद युनूस खान आणि मोहम्मद याकूबसाठी या दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. अटके नंतर अधिक तपास करत असताना पुणे पोलिसांनी कोंडव्यातील त्यांच्या राहत्या घरातून धाड टाकून त्यांचे लॅपटॉप जप्त केले होते. या लॅपटॉप मधून आता धक्कादायक माहिती समोर येते आहे. या दोन्हीही दहशतवाद्यांनी टेरर फंडिंगसाठी साताऱ्यातील एक सोन्याचा दुकान लुटलं होतं. या सोन्याच्या दुकानातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम देखील लंपास त्यांनी केली होती.