मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections पार्श्वभूमीवर एकीकडे महाविकास आघाडीकडून आज अंतिम बैठक घेऊन जागा वाटपावर निर्णय घेण्यात आले आहेत. पण दुसरीकडे महायुतीमध्ये मात्र केवळ बैठकांवर बैठकाच सुरू आहेत. आतापर्यंत एकाही जागेवर निर्णय झालेला नाही.
https://www.facebook.com/emahatalks/videos/325109670545159
सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार यांच्याशी देखील एक बैठक घेतली. एकंदरीतच आतापर्यंत जागा वाटप या विषयावर जितक्या बैठका महायुतीच्या झाल्या आहेत तेवढा आकडा शिंदे आणि अजित पवार गटाला जागा वाटपात मिळणार का ? असाच प्रश्न आता उपस्थित होतोय.
Kolhapur Lok Sabha Constituency : ” कष्ट करण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही..! ” संभाजीराजेंचा शाहू छत्रपतींना स्पष्ट पाठिंबा
भाजपने पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकाही जागेबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही एकूण 48 जागा आहेत. राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हा क्रीडा होण्यासाठी प्रयत्न केला आहे त्यानंतर आता महायुती मधील शिंदे गट आणि अजित पवार गटाला दहा दहा जागा जास्तीत जास्त मिळू शकतात अशी चर्चा आहे
दरम्यान आता जोपर्यंत अधिकृत घोषणा दिल्लीतून होत नाही तोपर्यंत नेमक्या किती आणि कोणत्या जागा कोणाला मिळतात हे तोपर्यंत स्पष्ट होणार नाही.