पुणे : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी 1 जानेवारी रोजी विजयस्तंभास अभिवादन Salutations to the Victory Pillar करण्यासाठी अनुयायि दाखल होत असतात. या अभिवादन कार्यक्रमासाठी नियोजन कामकाजाची आज जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या निर्देशानुसार प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. तसेच येथे करण्यात येत असलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला आहे.
पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी विजयस्तंभास अभिवादन करण्यास येणाऱ्या नागरिकांना सर्व सोयीसुविधा मिळतील यादृष्टीने पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, विद्युत प्रकाश व्यवस्था, वाहनतळ, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सुविधा, गर्दीचे व वाहतुकीचे नियोजन याविषयी माहिती घेण्यात आली.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, हवेली गट विकास अधिकारी भुषण जोशी आदी उपस्थित होते.
पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी विजयस्तंभास अभिवादन करण्यास येणाऱ्या नागरिकांना सर्व सोयीसुविधा मिळतील यादृष्टीने पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, विद्युत प्रकाश व्यवस्था, वाहनतळ, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सुविधा, गर्दीचे व वाहतुकीचे नियोजन याविषयी माहिती घेण्यात आली. तसेच या भेटीच्या वेळी विविध कार्यान्वयीन यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपास्थित होते.