मुंबई : सीआयडी CID या मालिकेतील फ्रेडरिक्स उर्फ दिनेश फडणीस Dinesh Phadnis Passes Away या अभिनेत्याच दीर्घ आजाराने निधन झालं आहे. अनेक दिवसांपासून ते लिव्हर, हृदय आणि किडनीच्या आजारपणामुळे उपचार घेत होते. आज कांदिवली तुंगा रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
दिनेश फडणीस यांनी वयाच्या 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लिव्हर, किडनी आणि हृदयाच्या त्रासामुळे त्यांनाच्यावर उपचाहर सुरु होते. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तातडीने कांदिवलीतील तुंगा रुग्णालयात 30 नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. परंतु त्यांचे शरीर उपचाराला साथ देत नव्हते. दरम्यान आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
अभिनेते दिनेश फडणीस यांच्या पार्थिवावर बोरिवलीतील दौलत नगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अचानक जाण्याने सहकलाकार आणि चहात्यांना मोठा धक्का बसला आहे.
अभिनेते दिनेश फडणीस यांनी अनेक प्रसिद्ध मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी सरफरोश, सुपर थर्टी या चित्रपटांसह तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेमध्ये देखील खास भूमिका केली आहे. तर त्यांनी सीआयडी या मालिकेत फ्रेडरिक्स नावाच्या इन्स्पेक्टरची केलेली भूमिका सर्वांच्या नेहमीच लक्षात राहील यात शंका नाही.