पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी Pune Accident Case सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतलेले रवींद्र धंगेकर Ravindra Dhangekar यांनी आता थेट उत्पादन शुल्क विभागाच्या Excise Department अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आज त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे Sushma Andhare या देखील सामील झाल्या. रात्री अपरात्री सुरू असलेल्या पब कडून किती हप्ते घेतले जातात याची एक यादीच सुषमा अंधारे यांनी सादर केली आहे त्यानुसार,
द माफिया The Mafia – 1 लाख रुपये
एजंट जॅक्स Agent Jacks – 50 हजार रुपये
टू बीएचके 2 BHK – 1 लाख
बॉलर Bowlers – 2 लाख
राजबहादूर मिल्स बिमोरा Raj Bahadur Mills Bimora – 1 लाख
मिल्ट Milt – 1 लाख
टीटीएम रुफटॉप TTM Rooftop – 5 हजार
स्काय स्टोरी Sky Story – 50 हजार
जिमी दा ढाबा Jimmy da Dhaba – 50 हजार
टोनी दा ढाबा Tony the Dhaba – 50 हजार
आयरिश Irish – 40 हजार
टल्ली टुल्स Talli Tools – 50 हजार
अॅटमोस्पिअर Atmospire – 60 हजार
रुड लॉर्ड Rudd Lord – 60 हजार
24 के 24K – 1.5 लाख
कोको रिको Coco Rico – 71 हजार रुपये
हे पब एवढा हप्ता ज्या अधिकाऱ्यांना देत होते त्यांची नावं देखील रवींद्र धंगेकर यांनी वाचून दाखवली आहे. यामध्येकॉन्स्टेबल सुर्वे, पडवळ, बाळासाहेब राऊत, राहुल रामनाथ आणि सुपरटेंडंट चरणसिंह रजपूत यांची नावं आहेत. आजच्या या धंगेकरांच्या आक्रमक पवित्र्याने त्यात सुषमा अंधारे सारख्या डॅशिंग नेत्या देखील या प्रकरणात आता सामील झाल्या आहेत. त्यामुळे एकंदरीतच हे प्रकरण आता राज्यासाठी नाही तर देशासाठी देखील गाजताना दिसून येत आहे.
आज रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना अक्षरशः भांबावून सोडलं होतं. ” तुम्ही खोटं बोलू नका, तुम्ही पाप करताय , तुम्हाला लय समजतं का? दर महिन्याला 70 ते 80 लाख हप्ता घेता, याची यादी माझ्याकडे आहे. तुमचे कोण कोण लोक पैसे आणून देत याची माहिती देखील माझ्याकडे आहे. तुम्ही स्वतःला शहाणे समजता का ? तुम्ही पुणे उध्वस्त केलं. तुम्हाला लाज कशी वाटत नाही ? ” अशा शब्दात धंगेकरांनी आज उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना फटकारलं आहे.
या संपूर्ण प्रकरणावर उत्पादन शुल्क विभागानं केवळ तुमचे सर्व आरोप खोटे आहेत एवढेच उत्तर दिले आहे. एकंदरीतच या धडधडीत आरोपांनंतर आता उत्पादन शुल्क विभागाबाबत मंत्रिमंडळ काय निर्णय घेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Pune Accident Case : ससूनच्या फॉरेन्सिक विभागातून मोठी हेराफेरी; वेदांतचे ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात आणि तपासले तिसऱ्याचेच सॅम्पल; प्रकरण असं झालं उघड !