पंढरपूर : कार्तिकी एकादशीला पांडुरंगाच्या पूजेचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा असतो. या वेळी नेमक्या कोणत्या उपमुख्यमंत्र्याला हा मन मिळणार यावर काही ठरले नसताना कार्तिकी यात्रेची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते न करता शेतकऱ्याच्या हस्ते करावी, असे पत्र सकल मराठा मोर्चाने दिले मंदिर समितीला दिले आहे. कार्तिकी एकादशीला पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्र्यांना एन्ट्री न देण्याचा निर्धार सकल मराठा मोर्चाने केला आहे.

मराठा आरक्षण आंदोलन राज्यभरात आक्रमक होत असून सकल मराठा समाज बांधव देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर संपूर्ण राज्यात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे. वारकऱ्यांच्या हस्ते पूजा करा, आरक्षण न देता कोणी येण्याचा प्रयत्न केल्यास काळे फासू असा इशारा समितीने दिला आहे.