पुणे : पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील सख्ख्या दिवंगत भावांच्या वेगवेगळ्या जाती असल्याचं समोर आलेलं आहे. एका भावाची मराठा तर दुसऱ्या भावाची कुणबी अशी जात शाळेच्या दाखल्यांवर नोंदवण्यात आलेली आहे. शाळेच्या दाखल्यांवर जना आंबटकर या मोठ्या भावाची कुणबी तर सुदाम आंबटकर या लहानग्या भावाची मराठा जात नोंदवण्यात आलेली आहे.
आंबेगाव तालुक्यातील फक्त एका गावातच 1120 नोंदी आढळल्या आहेत. याबाबत शाळेने तसे पत्रही सादर केले आहे. त्यामुळे अशा अनेक गावांच्या नोंदी समोर येणे बाकी आहे. सख्ख्या भावांच्या दाखल्यावर वेगवेगळ्या नोंदी असल्याचा हा पहिलाच प्रकार समोर आला आहे. मात्र असे अनेक प्रकार राज्यातही समोर येण्याची शक्यता आहे. काहींच्या नोंदी कुणबी केल्या गेल्या आहे. त्यानंतर त्यातील काही नोंदी मराठा म्हणून लावल्या गेल्या आहे.
आंबेगाव तालुक्यातील गावातच 1120 नोंदी आढळल्या आहेत. याबाबत शाळेने तसे पत्रही सादर केले आहे. अशा अनेक गावांच्या नोंदी समोर येणे बाकी आहे. सख्ख्या भावांच्या दाखल्यावर वेगवेगळ्या नोंदी असल्याचा हा पहिलाच प्रकार समोर आला आहे. मात्र असे अनेक प्रकार राज्यातही समोर येण्याची शक्यता आहे. काहींच्या नोंदी कुणबी केल्या गेल्या आहे. त्यानंतर त्यातील काही नोंदी मराठा म्हणून लावल्या गेल्या आहे. यानिमित्ताने शिंदे समितीने तयार केलेल्या अहवालावर ही प्रश्न उपस्थित केले जात आहे.