ठाणे : कोर्टाने दिलेल्या डेडलाईन नंतरही राज्यात अजून काही ठिकाणी पाट्या मराठी Marathi Patya भाषेत काहींनी केल्या नाहीत. त्यामुळे ठाण्यात मनसैनिकांनी MNS व्यापाऱ्यांना तीन दिवसात मराठी पाट्या लावण्याचा इशारा दिला आहे. दुकानाचे नामफलक मराठीत झाले नाही तर मनसे स्टाईलने खळखट्याक करण्याचा इशाराच मनसेकडून देण्यात आला आहे. मुंबईमध्ये Mumbai मनसैनिकांची मराठी माणसा जागा हो मोहीम सुरु आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीमध्ये भारतभरातून अनेक जण आर्थिक उलाढालीसाठी आले. आणि मुंबईने देखील त्यांना आपलस करून घेतल. मुंबई कोणाला उपाशी पोटी झोपू देत नाही असा म्हणतात, पण आज मराठी माणूस आपल्याच मुंबई मध्ये अपमानाने पोट भरून झोपतो आहे. मनसैनिकांनी नेहमीच मराठी माणसासाठी आवाज उठवला आहे. मुंबईतील दुकानांवर मराठी भाषेतच पाट्या लावल्या जाव्यात यासाठी मनसैनिक आक्रमक झाले आहेत.
ठाणे मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी देखील मराठी पाट्या नसतील तर शहानिशा करून नोटीस बजावत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेच्या वतीने 9 प्रभाग समिती मध्ये असणाऱ्या सहाय्यक आयुक्तांना पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी देखील दुकाने विविध आस्थापना मराठी पाट्या नसेल तर त्यावरती शहानिशा करून नोटीस बजावत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
व्यापाऱ्यांना नेमके कोणते नियम पाळावे लागणार
आस्थापनेचे नाम फलक देवनागरी मराठी भाषेतील जरी असेल तरी त्यावरती अक्षर लेखन हे नाम फलकावर सुरुवातीलाच मराठी भाषेत असणे बंधनकारक
मराठी भाषेतील अक्षरांचा टंक (फॉन्ट )इतर कोणत्या भाषेतील अक्षरांचा टंक आकारापेक्षा लहान असता कामा नये