सोलापूर : मराठा आरक्षण Maratha Reservation या विषयावरून अद्याप देखील मनोज जरांगे पाटील यांच आंदोलन सुरूच आहे. अर्थात आंदोलनाचा पवित्रा बदललाय, काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील हे प्रचंड आक्रमक झाले होते. आणि त्यानंतर त्यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत अपशब्द वापरून मुंबईकडे मोर्चा वळवला होता. त्यानंतर राजकीय वातावरण देखील प्रचंड प्रमाणात ढवळले गेले. आता सध्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांना डीवचल आहे.
जरांगे पाटील यांच्या वक्तव्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. त्यानंतर भाजपा आमदारांनी देखील आक्रमक भूमिका घेतली होती. मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि एसआयटी चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत. दरम्यान त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आमरण उपोषण मागे घेतल. उपचार देखील घेतले, परंतु साखळी उपोषण आणि दौरे सुरूच ठेवले आहेत. सध्या जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून सोलापूरमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे.
काय म्हणाले जरांगे पाटील
सोलापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे ते म्हणाले की, “मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती गठीत करण्यात आली आहे. दरम्यान, शिंदे समितीच्या वतीने शोधण्यात येत असलेल्या कुणबी नोंदींची संख्या आणखी वाढली असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. यापूर्वी 57 लाख नोंदी सापडल्याचा दावा जरांगे यांच्याकडून करण्यात आला होता. मात्र, आता याच नोंदी वाढल्या असून, आकडा 63 लाखांवर पोहचला असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांच्यासह सुमारे 1 कोटी लोकांना आरक्षण मिळणार आहे. तसेच ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना सगेसोयरे कायद्यानुसार आरक्षण मिळेल.” असेही जरंगे पाटील म्हणाले आहेत.
Supreme Court : 15 जूनपर्यंत कार्यालय रिकामे करा ! आम आदमी पक्षाला सुप्रीम कोर्टाचे आदेश, वाचा नेमकं प्रकरण काय ?