छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे यांनी काल उपोषण सोडलं. सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची मनधरणी करण्यासाठी आलं होतं. या शिष्टमंडळाने मनोज जरांगेंना सर्व कायदेशीर बाजू समजावून सांगितली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या हातून ज्यूस पिवून जरांगे यांनी काल संध्याकाळी उपोषण सोडलं. त्यानंतर त्यांना रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु आता त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आलीय.
हे वाचलेत का ? पुणे विद्यापीठातील हॉस्टेलच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण; परिसरात तुफान राडा, वाचा सविस्तर
मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांचे रिपोर्ट्स आले असून या रिपोर्ट्समध्ये मनोज जरांगे यांच्या किडनी आणि लिव्हरला सूज आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळेच त्यांना रुग्णालयात उलट्या झाल्या आहेत.तसेच त्यांना चक्कर येते आहे.त्यांचा अशक्तपणा वाढला असल्याने त्यांची तब्येत खालावल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.