मणिपूर : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराची Manipur Violence धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मणिपूरच्या तेंगनोउपल जिल्ह्यात दोन गटात गोळीबाराची गंभीर घटना घडली. या अंधाधुंद गोळीबारात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे सुरक्षा दलांच्या केंद्रापासून 10 किलोमीटर अंतरावर हा हिंसाचार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मणिपूरच्या तेंगनोउपल जिल्ह्यात दोन गटात अंधाधुंद गोळीबार झाला. घटनेची माहिती मिळताच आसाम रायफल्सची टीम घटनास्थळी दाखल झाली लीथू गावाजवळ 13 मृतदेह आढळून आले आहेत. धक्कादायक म्हणजे हे मृतदेह परिसरातील नागरिकांचे नसल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत एकाही मृतदेहाची ओळख पटली नसून घटनास्थळी कोणतेही हत्यार देखील मिळाले नाही.
विशेष म्हणजे तेंगनोउपल येथीन कुकी-जो या समाजाकडून भारत सरकार आणि यूएनएलेफ यांच्यात झालेल्या शांतता कराराचं स्वागत करण्यात आलं होतं. पण त्यानंतर लगेच आज दुसऱ्या दिवशी या जिल्ह्यात हिंसाचाराची मोठी घटना समोर आली आहे.
या परिसरात पुन्हा तणाव निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गेल्या ७ महिन्यांपासून इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात अली होती. दरम्यान रविवारी इंटरनेट सेवेवरील बंदी दूर करण्यात आली होती. इंटरनेट सेवेवरील बंदी उठवल्यानंतर आज हिंसाचाराची घटना घडली आहे. सीमावर्ती भागातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही इंटरनेट सेवा बंद आहे.