नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडी असो, महायुती असो कोणाच्या पदरात किती जागा येणार यावर बैठका सुरू आहेत. अशातच आता मनसे प्रमुख राज ठाकरे Raj Thackrey हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांना महाविकास आघाडी सोबत जाणार का ? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
काय म्हणाले राज ठाकरे
सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बैठका पार पडल्यानंतर आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जरांगे पाटील, मराठी शाळा, अयोध्या अशा विषयांसह महाविकास आघाडीमध्ये जाणार का ? या प्रश्नावर देखील थेट उत्तर दिल आहे.
Lok Sabha Elections : ” महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये…! ” नाना पटोले आणि संजय राऊतांनसमोरच नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर, वाचा वाचा सविस्तर
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, ” पुढे ठरवू काय करणार, अजून वेळ आहे. सर्व जागा लढवाव्या अशी मागणी पक्षातून होते. कुठे निवडणूक लढवावी याबाबत चाचणी करत आहोत. सत्ताधारी पक्ष ही चाचपणी करत आहेत, आम्हीही करतोय. आताचे लवंडे कुठे जातील याचा पत्ता नाही. यांच्या महाविकास आघाडीकडे कोण जाणार ? त्यांचाच काही भरवसा नाही. इंडिया आघाडीत नितीश कुमारही होते, कुठे गेले ? असा सवाल देखील यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.