मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीमुळे Lok Sabha Elections राजकीय वातावरण प्रचंड वेगवान झाला आहे. सर्वच राजकीय पक्ष आपली पूर्ण ताकद लावून या निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी आता प्रयत्न करणार आहेत या स्पर्धेमध्ये सत्ताधारी भाजपन देखील तलवार उचलून हर हर महादेव म्हटले आहे.
नुकतीच भाजपने आपली लोकसभेसाठी ज्या उमेदवारांची यादी जाहीर केली यामध्ये 195 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पण विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याचं नाव नाही. धक्कादायक म्हणजे नितीन गडकरी सारख्या नेत्याचं पहिल्या यादीमध्ये नाव न आल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आल आहे. अशातच आता संजय राऊत यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे.
https://www.facebook.com/share/v/ahaSi7vxFD4u3P47/?mibextid=qi2Omg
काय म्हणाले संजय राऊत
भाजपच्या लोकसभेसाठीच्या उमेदवारीच्या पहिल्या यादीमध्ये नितीन गडकरी सारख्या नेत्याचं नाव नसल्या कारणाने संजय राऊत यांनी भाजपवर घणाघाती टीका करताना म्हटला आहे की, ” नितीन गडकरी दिल्लीत असूनही त्यांचा पत्ता आत्तापासून कट करण्याचं हे षडयंत्र आहे. चार दिवसांपूर्वीच गडकरी शेतकऱ्यांबाबत स्पष्ट बोलले होते. मजूर आणि कष्टकरी हा दुःखी आहे समाधानी नाही. कोणत्या मंत्र्याची स्पष्ट बोलण्याची हिंमत आज आहे का ? नितीन गडकरी हे स्पष्ट वक्ते आहेत. गडकरी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्सीम भक्त आहेत. त्यामुळे ते दिल्लीची गुलामी पत्करणार नाही. असा त्यांचा स्वभाव आहे. आम्ही त्यांच्यासोबत जवळून काम केले आहे. नितीन गडकरी विकासाला महत्त्व देतात. ते ढोंगबाजी आणि फसवणुकीला महत्त्व देत नाही. आज जो विकास दिसत आहे ते म्हणजे नितीन गडकरी सांभाळत असलेल्या मंत्रालयाचे आहेत. अशा शब्दात त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले. तसेच महाराष्ट्रात मराठी बाणा जपणाऱ्या या नेत्याला अपमानित करायचं आणि आपल्या पायाशी आणायचं अशा प्रकारचं हे षडयंत्र असल्याचे टीका त्यांनी भाजपवर केली आहे.