बीड : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections 2024 पार्श्वभूमीवर राज्याचं राजकीय वातावरण देखील तापलेल आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकसभा मतदार संघामध्ये एक वेगळा इतिहास आहे. असाच एक खास इतिहास आहे तो म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघाचा जो फिरतो ‘मुंडे’ नावाभोवती…
अर्थात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या मुली भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. बुधवारी सायंकाळी लोकसभा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये यावेळी भाजपने प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून ते त्यांची बहीण पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याचं जाहीर केलं. यानंतर आज पंकजा मुंडे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन मी माझ्या त्या शब्दावर कायम आहे असे म्हटले आहे.
https://www.facebook.com/emahatalks/videos/228701886936986
नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे
गेली दहा वर्षापासून बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रीतम मुंडे या खासदार होत्या. भाजपने आता त्यांची उमेदवारी रद्द करून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. यावर पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन म्हणाल्या कि, ” प्रीतम ताई खासदार असताना मी पाच वर्ष घरी बसले. आता मला असं वाटतं तेवढा वेळ प्रीतम ताईंना वाट बघावी लागणार नाही. ” असं सूचक वक्तव्य केलं.
भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या की, “ प्रीतम मुंडे या वडील गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांचं एवढं छान डॉक्टरचं करिअर सोडून राजकारणात आल्या. त्यांनी दहा वर्ष संपूर्णपणे स्वत:ला राजकारणात वाहून घेतलं. आमच्या दोघींचं समन्वय फार छान होतं. मी राज्य सांभाळायची ते जिल्हा सांभाळायच्या. मी ज्या गोष्टी वेळेअभावी करु शकत नव्हती त्या गोष्टी प्रीतम ताई करत होत्या. मी धोरणात्मक गोष्टी करायची तर व्यक्तीगत गोष्टी त्या करायच्या. त्यामुळे आमच्या दोघींमध्ये तो समव्य चांगला होता आणि ते भविष्यातही राहणार आहे.मी जे शब्द जाहीररित्या सांगितले की, मी प्रीतम मुंडे यांना विस्थापित करणार नाही. त्या शब्दावर मी कायम आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.