लातूर : लातूरमधून Latur एक मोठी बातमी समोर येते आहे. लातूर लोकसभा मतदारसंघाची Lok Sabha Election निवडणूक आज तिसऱ्या टप्प्यामध्ये पार पडली आहे. दरम्यान लातूर मधील सुनेगाव सांगवी येथील मतदान केंद्रावर आज मतदानासाठी ग्रामस्थांनी हजेरीच लावली नसल्याचा प्रकार समोर आला.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर लोकसभा मतदारसंघातील सुनेगाव सांगवी या मतदार संघामध्ये आज एकाही मतदारांनी मतदान केलेले नाही. तब्बल 477 मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. विशेष म्हणजे लोकसभाच नाही तर मागणी मान्य झाली नाही तर यापुढच्या कोणत्याही निवडणुकीत मतदान करणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.
नेमका निवडणुकीवर बहिष्कार का टाकला
सुनेगाव सांगवी हे गाव लातूर नांदेड हायवेवर आहे. गावातील नागरिकांना या हायवेला कोणताही कट नसल्याकारणाने त्यांना रस्ता पार करणे जोखमीच बनल आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी असो किंवा शेतकरी असो सर्वांनाच हा रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला जावं लागतं.किंवा मोठा वळसा घेऊन जावे लागते. सातत्याने वाहता असलेला हायवे पार करताना त्यांना अक्षरशा जीव मुठीत घेऊन हा रस्ता पार करावा लागतो. याच कारणामुळे गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे.