दिल्ली : दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाळ राय यांनी सांगितलं की, दिल्लीतील हवेची गुणवत्ता ढासळत चालली आहे. 30 ऑक्टोबरपासून दिल्लीतील प्रदूषणात वाढ झाली आहे. दिल्लीत एकीकडे थंडी वाढताना दिसत आहे, तर दुसरीकडे हवेतील प्रदूषणही वाढ आहे. हवेतील धूलीकणांमुळे नागरिकांना श्वास घेण्यासही अडथळे निर्माण होत आहेत. वाढलेल्या प्रदूषणामुळे नागरिकांचा आरोग्यावरही वाईट परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासन विविध उपाययोजना करताना दिसत आहे.तसेच 50 टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम आदेश देण्यात आला आहे. सोमवारपासून सरकारी आणि खासगी कंपन्यांचे फक्त टक्के कर्मचारी त्यांच्या कार्यालयात येतील, असा आदेश सरकारने जारी केला आहे.
या पार्श्वभूमीवर बांधकामांना बंदी, शाळांना सुट्टी, रस्त्यावर सम-विषम प्रमाणे वाहनांना परवानगी अशा मोठ्या निर्णयांचा समावेश आहे. येत्या 13 ते 20 नोव्हेंबरपर्यंत ऑड-इव्हन अर्थात सम विषम नियम लागू होईल. याशिवाय कोणत्याही बांधकांमांना परवानगी नाही. तसंच 11 वी पर्यंतच्या शाळांना 10 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी असेल. इतकंच नाही तर BS-3 पेट्रोल आणि BS-4 डिझेल कारवर पूर्णपणे बंदी असणार आहे.